Bigg Boss 13 | Highest Paid Tv Host Salman Khan | ५ आठवड्यात कमवणार ७५ कोटी | Lokmat Manoranjan

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त शो बिग बॉस १३ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या शो टीआरपीच्या शर्यतीतही अग्रेसर आहे.
प्रेक्षकांचा शोला मिळणारा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी हा सीझन पाच आठवडे आणखीन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जवळपास १०० दिवस चालणारा बिग बॉस शो आता पाच आठवडे आणखीन प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सलमान खान प्रत्येक आठवड्यासाठी आधीच्या मानधनासोबत आणखीन दोन कोटी एक्स्ट्रा घेणार आहे.सलमान खानला बिग बॉस १३च्या सूत्रसंचालनासाठी प्रत्येक आठवड्याला १३ कोटी रुपये मानधन दिले जात होते. मात्र आता त्याला १५ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. अशाप्रकारे सलमानला पाच आठवड्यांसाठी ७५ कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे.

Subscribe to Our Channel